मेक इन इंडिया-आपला इतिहास काय सांगतो?

सध्या मुंबईत मेक इन इंडियाची धामधूम सुरू आहे. आंतरराष्ट्रीय समुदायापुढे भारतीय उत्पादन क्षमतेचा उत्सव साजरा करून जगभराच्या निरनिराळया उद्योजकांनी भारतात येऊन आपल्या उत्पादनाची निर्मिती करावी, अशी भूमिका तयार करणे हा मेक इन इंडियाचा उद्देश आहे. आज भारत आणि चीन पुन्हा एकदा आर्थिकदृष्टया महत्त्वाचे देश ठरू लागले. परंतु हे चक्र पूर्ण झाले, असे म्हणता येत नाही. भारतातल्या स्वातंत्र्योत्तर आर्थिक विकासामध्ये उत्पादन क्षेत्राचा टक्का अजून तरी नगण्य आहे. उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन दिल्याशिवाय भारतीय अर्थव्यवस्थेला बळ येणार नाही. खरे तर 'मेक इन इंडिया'चा या परिप्रेक्ष्यात विचार व्हावा.
एका नव्या ऊर्जाक्रांतीच्या दिशेने
पुण्याजवळील पिरंगुट येथील जैविक उर्जा प्रकल्पातून दिवसाला 100 किलो सीएनजी निर्मिती होत आहे. प्रकल्पाचे संशोधन समन्वयक संतोष गोंधळेकर यांचं संशोधन देशासाठी वरदान ठरणार आहे. केवळ 'प्रदूषणरहित ऊर्जा' एवढंच या प्रकल्पाचं महत्त्व नाहीये. खेडेगावांमध्ये मोठया प्रमाणात जाळल्या जाणाऱ्या जैविक कचऱ्याचं योग्य उपयोजन होऊन त्यामुळेही प्रदूषणाला आळा बसणार आहे आणि ग्रामविकासाला चालना मिळणार आहे.
हिंदुस्थान एरॉनॉटिक्स आणि राफेल विमान
‘हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड’ (एचएएल) या सरकारी कंपनीकडून विमाननिर्मितीत होणारी वेळेची दिरंगाई, अवाढव्य किमती आणि सदोष उत्पादन यांमुळेच संरक्षणसामग्री उत्पादन खासगी क्षेत्राकडे वळवणे क्रमप्राप्त ठरते. गेल्या काही वर्षांपासून काही खासगी कंपन्याही संरक्षणसामग्री उत्पादनात यशस्वी झाल्या आहेत. ‘मेक इन इंडिया’ योजनेंतर्गत खाजगी संस्थांना संरक्षणविषयक उपकरणे आणि विमाने भारतातच तयार व्हावीत यासाठी ४९ टक्के विदेशी गुंतवणुकीला मान्यता दिली. आशा करू या की, ‘एचएएल’च्या अनुभवातून शिकून भारतीय शास्त्रज्ञ आणि खासगी क्षेत्र भारतात विमाननिर्मिती करण्यात यशस्वी होतील.