लघु उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे ८ एप्रिल २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे मुद्रा बँक या एका महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात केली. २०१५-१६च्या अर्थसंकल्पीय भाषणात वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या योजनेची घोषणा केली होती. देशातील युवकांना तसेच महिलांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी किंवा जुन्या लघु उद्योगांसोबत जोड म्हणून नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेची सध्या चांगलीच मदत होत आहे. कृषी व्यवसायाव्यतिरिक्त कुटीरोद्योग, दुग्ध व्यवसाय, दुकान, लहान रेस्टॉरंट, गॅरेज, फळ विक्री यासारखे अनेक लघु उद्योग सुरू करण्यासाठी ५० हजार ते १० लाखांपर्यंत मदत होऊ शकेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.