जवळपास वीस महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या स्टार्टअप इंडिया या योजनेतून सरकारचे सहाय्य मिळालेल्या कंपन्यांचा ५० अब्ज डॉलर्स एवढा व्यापार झाल्याचे वाणिज्य मंत्रालयातर्फे आज सांगण्यात आले आहे. या स्टार्ट अप्समध्ये विविध आद्योगिक क्षेत्रांमधील कंपन्यांचा समावेश केला गेला आहे. भारतात साध्या एकूण २० हजारांहून अधिक स्टार्टअप कंपन्या अस्तित्वात असल्याचे यावेळी मंत्रालयतर्फे नमूद करण्यात आले. लहान नवउद्योजकांना आर्थिक पाठबळ लाभण्यासाठी स्टार्टअप इंडिया या योजनेमार्फत मदत केली जात असून भारताला सर्वात मोठी स्टार्ट अप्सना पूरक अशी अर्थव्यवस्था म्हणून ओळखले जाण्यासाठी हा प्रयत्न सुरु आहे.
- प्रतिनिधी, महा एमटीबी