व्हॉटसअॅप बिझनेस चीफ निरज अरोरा यांचा राजीनामा

सॅन फ्रान्सिसको : सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉटस्अॅपच्या चीफ बिझनेस ऑफिसर नीरज अरोरा यांनी राजीनामा दिला आहे. सोमवारी त्यांनी ही घोषणा केली. ‘मला माझ्या परिवारासाठी वेळ द्यायचा असल्याने मी हा निर्णय घेतला आहे’, असे त्यांनी सांगितले. अरोरा २०११मध्ये गुगलमधून व्हॉटसअॅप इनकॉर्पोरेशनमध्ये रुजू झाले होते. फेसबूकने २०१४ साली १९ अब्ज डॉलर्सना व्हॉटसअॅपची खरेदी केली होती. या करारामध्ये अरोरा यांची प्रमुख भूमिका होती. आयआयटी दिल्ली आणि इंडियन स्कुल ऑफ बिझनेसमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केले.

राजीनाम्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी आता पुढे वाटचाल करायची आहे, असे सांगत त्यांनी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. ‘वेळ निघून जाते, आठवणी मात्र तशाच राहतात. व्हॉटसअॅपशी जोडल्यानंतर मला आता सात वर्ष पूर्ण झाली आहेत. या दरम्यान प्रतिभावान लोकांच्या सहवासात राहिल्याचे भाग्य मला मिळाले. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. एखादे अॅप कसे कोट्यवधी लोकांना आकर्षित करू शकते. व्हॉटसअॅप दररोज असंख्य लोकांशी जोडत आहे. मात्र, याचा मी फार काळ अभिमान बाळगू शकत नाही. व्हॉटसअॅप केवळ साधे सरळ सोपे उत्पादन असेल, असा मला विश्वास आहे. मला आता परीवारासह वेळ घालवायचा आहे. ज्यांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली त्यांचा मी ऋणी आहे. त्यांच्या विश्वासामुळेच इथवरचा प्रवास शक्य झाला.’, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

नीरज हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळतील, अशी शक्यता गेल्या महिन्यात व्यक्त केली जात होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे. नीरज यांच्या राजीनाम्या पूर्वी या वर्षी मे महिन्यात मुख्य कार्यकारी अधिकारी जान कोम यांनीही राजीनामा दिला होता.

- प्रतिनिधी, महा एमटीबी

udyogvivek@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.